भुरकी येथील तरुणाला वाघिणीने ठार केले * वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मसगणी * शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण *
सुरेंद्र इखारे वणी – गेल्या काहमहिन्यांपासून वणी तालुक्यात कुठल्या ना कुठल्या गावाच्या शिवारात किंवा शेतात गावकऱ्यांना वाघ दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत व शेतमजुरासह इतर नागरिकांमध्ये सुध्दा भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना आज दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोज सायंकाळी 5.30 वाजता वाघिणीने वणी तालुक्यातील भुरकी गावातील एका अभय मोहन देऊलकर या 22 वर्षीय तरुणाला ठार मारले आहे त्यामुळे गावात वाघिणीची भीती निर्माण झाली आहे. ही भीती दूर करण्यासाठी वनविभागातिल वरिष्ठांनी गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी भुरकी वासीयांकडून होत आहे.