महापुरात नष्ट झालेल्या पिकांची वाढीव मागणी * नदीकाठावरील नष्ट पिकांचा शासन निर्णय नाही* 50 हजार प्रति हेक्टर ची मागणी *
सुरेंद्र इखारे वणी – महापुरात नष्ट झालेल्या पिकांची स्वतंत्र नोंद घेऊन वाढीव लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन माजी. जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना देण्यात आले आहे. तालुक्याच्या खरीप हंगामात मोठ्या नद्यांच्या महापुरामुळे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पर्जन्यमानामुळे नदी नाल्याना महापूर येऊन शेतकऱ्यांना दुबार तिबर पेरणीला तोंड द्यावे लागले असून महा पुरामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागले . राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती मध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आहे. परंतु नदीपरिसरतील खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन,तूर, मुंग,व भाजीपाला यावर खर्च करून हाताशी आलेले पीक चौथ्या पुराणे पाण्याखाली आले. त्यामुळे संपुर्ण पीक नष्ट झाले. हे संकट नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या पिकावर येऊन पीक नष्ट होते ही बाब शासन निर्णयात नाही परंतु हे नुकसान शेतकऱ्यांचे असल्याने मानसिक दृष्टया जातो ही बाब गँभिर आहे. अतिवृष्टी 65 मी ली पाऊस व महापुरामुळे होणारे नुकसान दोन्ही मदत सारखीच आहे. कारण महापुरात 72 तास पिके पाण्याखाली असेल तर पिके नष्ट होते . या बाबींचा समावेश नैसर्गिक आपत्ती मदत धोरणात करणे गरजेचे आहे. अशा संकटांना 50 हजार रुपये प्रति हेक्टर मदत धोरणाचा शासन निर्णय करून शेतकऱ्यांना खरी मदत होईल. व नव्या उमेदीने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी वाढीव मदतीमुळे दिलासा मिळेल. तेव्हा कृषी व महसूल विभागाकडून माहिती घेऊन अतिशीग्र शासन निर्णय काढून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागनीचे निवेदन संबंधित अधिकारी आमदार संजीवरेड्डी बोडकुरवा, जिल्हाधिकारी अमोल येडगे, तहसीलदार निखिल धुळधर, याना देण्यात आले यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर व समस्त शेतकरी होते.