भारत जोडो यात्रेचे लोन वणीत दिसुन आले….
प्रशांत जुमनाके वणी: मा.राहुल गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार याच्या नेतृत्वात पूर्ण भारत भर चालू असलेल्या पदयात्रेचे लोन वणी येथे आज दिनांक १२/११/२०२२ रोजी वणी शहरात दिसून आले.संपूर्ण भारत देशाला या पदयात्रेच्या माध्यमातून भारत जोडो हा संदेश देत संपूर्ण जन मानसात त्यांचा उत्साह वाढतच चालला आहे.याची प्रचिती वणी शहरात बाईक रॅलीच्या माध्यमातुन शहर भर फिरताना दिसले. काँग्रेसचे दिग्गज नेतृत्व असलेले मा.खासदार बाळुभाऊ धानोरकर , माजी.आमदार वामनराव कासावार वणी विधानसभा क्षेत्र,व मा.संजय खाडे अध्यक्ष रंगनाथ स्वामी अर्बन निधी ली. संचालक वसंत जिनिगचे ॲड.देविदास काळे, राजाभाऊ पाथ्रडकर संचालक वसंत जिनिंग, टिकाराम कोंगरे, अध्यक्ष जि.मध्य.सह.बँक वणी, प्रा.शंकर वऱ्हाटे यांच्या सह नेतृत्वात भारत जोडोची बाईक रॅल्लीचे आयोजन वणीत करण्यात आले.असून वणीतील मुख्य रस्त्यासह सर्व महापुरुषांचे पुतळ्याला अभिवादन करत हा बाईक मार्च सर्व वणी कर जनतेला भारत जोडीचा संदेश व काँग्रेस पक्षाशी नवबांधनी नव तरुणांना घेऊन मोठ्या उत्साहात वणीत दिसून आली.या प्रसंगी वणीचे प्रतिष्ठित काँग्रसचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने सर्वस्वी संचालक वसंत जिनिग वाणीचे पुरुषोत्तम आवरी,प्रमोदजी वासेकर,आशिष कुळसंगे, प्रशांत जी गोहोकर, पलाश बोढे, तेजराजबोढे, प्रमोद निकुरे, जयकुमार आबड, घनश्याम पावडे, विनोद गोडे, गजानन खापने, अशोक धोबे, रवींद्र धानोरकर, राजेंद्र कोरडे, अशोक नागभिडकर, इजहार भाई, बाळू सोनटक्के, वंदनाताई आवारी, संध्याताई बोबडे, वंदना धगडी, ढेपाले ताई, साधना गोहोकार, साधना ठाकरे आदी मोठ्या संख्येने बाईक रँलीत सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या बाईक रँलीची सांगता खासदार:-बाळूभाऊ धानोरकर यांच्या निवासस्थानी करण्यात आली.