* वाघाचा बंदोबस्त करून नागरी वस्तीचे जीवन सुरक्षित करा…
* वाघ बाधित क्षेत्रातील मानवी जीवन धोक्यात…
प्रशांत जुमनाके वणी : तालुक्यातील लगत असलेल्या खेड्यातील क्षेत्रात नुकत्याच घडलेल्या वाघाचे हल्याचे घटनेने संपूर्ण वाघ बाधित परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहेत.दिनाक १०/११/२०२२ रोजी अभय मोहन देऊळकर वय २५ वर्ष या तरुणाला वाघांनी अचानक हल्ला करून त्या तरुणाला ठार मारले. या घटनेने तालुक्यात पूर्णतः खळबळ माजली आहेत..
सविस्तर वृत्त असे की प्रथम सन २०१७ मध्ये उकणी खड परिसरात वाघ आला आणि अनेक जनावराचा वाघाने फडशा पाडला.त्या वाघाचा संचार वर्धा नदी लगत असलेल्या पिंपळगाव,बोरगाव, जूनाळा ,कोलार पिंपरी, गोवारी,मुंगोली,भालर,निरजई परिसरात होता. परंतु त्यावेळेस कुठलीही मानवी जीवितहानी आलेली नाहीत.परंतु आज रोजी घडलेल्या या घटने मुळे या परिसरात मनुष्याचे मनात भीतीचे वातावरण पसरले . या चार वर्षात या परिसरात ६ ते ७ वाघ फिरत आहे. खान बाधित क्षेत्रातील गावे वेकोलिनी १० ते २० गावे वेकोलिने अधिग्रहण न केल्याने या क्षैत्रातिल लोकांना वेकोली निर्मित जंगलात राहावे लगत आहेत.त्यामुळे या परिसरात लोक आणि ३००० वेकोलि कर्मचारी, विद्यार्थ्यांना यांना भीतीचे वातावरणात प्रवास करावा लागत आहे. वणी तालुका परिसर वेकोलीने व्यापला असून वेकोलिमधील ढिगारे, खुली जागा ,ढिगारे,व फोसोफिस वनस्पतीची झाडे वाढली असून त्यामुळे सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सदर मागील 4 वर्षात वाघाच्या संकेत वाढ व मुक्त संचारा ने शेतकरी,शेतमजूर,कामगार यांचे मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोणत्याही नागरिकास जीवितहानी होणार नाही अशी व्यवस्था करावी करिता वनविभागाचे वतीने मा.सुधिर मुनगंटीवार वनमंत्री, यांना निवेदन देण्यात आले आहेत.