भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालकदिन म्हणून साजरी…
शाळकरी मुलांचा शिवार भेटीत बालदिनाचा उपक्रम… ..
प्रशांत जुमनाके.वणी..स्वतंत्र भारताचे पंहीले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू भारतातील एक वसाहतविरोधी राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी आणि लेखक होते. नेहरू हे विसाव्या शतकाच्या मध्यभागी भारतातील मध्यवर्ती व्यक्ती होते. ते १९३० आणि १९४० च्या दशकात भारतीय राष्ट्रवादी चळवळीचे प्रमुख नेते होते. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी सोळा वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले. नेहरूंनी १९५० च्या दशकात संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार केला आणि आधुनिक राष्ट्र म्हणून भारताच्या प्रतिमेवर जोरदार प्रभाव पाडला. यांचे अवचित साधुन
आज दिनांक १४/११/२९ रोज सोमवारला जि प शाळा सिंधी वा्ढोणा,पिल्की वाढोणा येथील शिवार भेट शाळेपासून तीन किलोमीटर असलेल्या मालेगाव मारुती येथील मंदिरात आणि आजूबाजूचा परिसर दाखवण्यासाठी काढण्यात आले.भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त बालक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणपतीभाऊ आवारी आणि संपूर्ण शिक्षक हजर होते.
मुलांनी पंडित जवाहरलाल नेहरू विषयी माहिती सांगितली तसेच ज्ञानकुंडाद्वारे मनोरंजन खेळ घेण्यात आले मुलांचे डान्स, गाणी, कविता, अभिनयातून मनोरंजनात्मक आनंद देणाऱ्या कृती घेण्यात आल्या.कपिल आणि सागर दोन मुलांचा वाढदिवस साजरा करण्यात आले. मुलांना जिलेबी सोन पापडी, केळी कच्चा चिवडा,असा नाश्ता देवून परिसराची माहिती सांगण्यात आली. शेवटी मसालेभात दह्याची कढी भोजनाने शिवार भेटीची सांगता करण्यात आली.