* पिल्की वाढोना येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती साजरी…
* आदिवासी बांधवांच्या वतीने रॅली शुभारंभ पार….
प्रशांत जुमनाके वणी : तालुक्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील लगत असलेले पिल्की वाढोणा या गावात महामानव क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंतीच्या पर्वोवर गावातील आदिवासी बांधव यांचे वतीने हा १५ नोव्हेंबर २०२२ रोजी रॅली चे शुभारंभ करण्यात आले. आदिवासींचे अस्तित्व हे टिकून राहायला पाहिजेत, आणि आपला माणूस जागा झाला पाहिजे. तरी त्यावेळेस समाजावर होणारे अन्याय यातून लोकांना कसे सावरता येईल यासाठी ज्यांनी उलगुलान केला.असे महामानव क्रांतीसूर्य बिरसा मुंडा याची आज जयंती साजरी करण्यात आली . असून रॅली मध्ये बिरसा मुंडा यांचे जयंती बाबत घोषणा नाऱ्यानी करत ही रॅली पिल्की वाढोणा गावातून काढण्यात आली. रॅली पार पडल्यानंतर बिरसा मुंडा जयंती चे कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तरी या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन नैताम,प्रमुख पाहुणे दौलत करपते, संदीप ढेंगळे तंटामुक्ती अध्यक्ष, प्रशांत जुमनाके ग्राम. पं.सदस्य,गणपत कोसरकर,हरिदास नागतुरे, अमोल डोनेकर, महेश जुमनाके, गणपत आत्राम,रमेश मोहितकर,दशरथ जुमनाके, विशाल सोयाम,गिता पेंदोर, प्रभावती जुमनाके,अनिता नैताम,सविता उपरे,पुजा डोनेकर, मंगला ऊईके, तथा समस्त पिल्की वाढोना ग्रामवशी उपस्थित होते.