शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा *
कार्यकर्त्यांकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली.*
सुरेंद्र इखारे वणी – महाराष्ट्राचा वाघ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज १०वा स्मृतिदिन आयोजित करण्यात आला. स्मृतिदिनानिमित्त राज्यभरातील शिवसैनिकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली . मुंबईच्या शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावरही शिवसैनिकांची गर्दी .महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहली आहेत.तमाम शिवसैनिक आपल्या लाडक्या ‘साहेबां’ना घरातून, कार्यालयातून आणि मनामनातून ‘जय महाराष्ट्र’अशी साद घालत मानवंदना दिली. सन १९६९ ते २०१२ पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणावर बाळासाहेबांचा प्रभाव होता . १९९१ ते २०१२ पर्यंत देशातील हिंदू समाजाचे रक्षक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे होते . आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी मराठी मन तर जपलेच , पण त्याचवेळी देशात हिंदुत्वाचा वनवा देखील चेतविला होता’, अशी भावना सामान्य जन मानसात निर्माण केला होता . अश्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०व्या स्मृतिदिन आज दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोज सकाळी नगर सेवा समितीच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे जलाभिषेक व पुष्प माला अर्पण करून अभिवादन केले . यावेळी उपस्थित माजी सैनिक नामदेवराव शेलवडे, राजेंद्र साखरकर, राजु तुराणकर, मंगल भोंगळे, जनार्दन थेटे, राहुल झट्टे व अन्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.