कायरचा प्रशांत निखाडे ए एस ओ मध्ये राज्यातून प्रथम।
आईवडिलांचे स्वप्न केले साकार* सर्वत्र कौतुक
सुरेंद्र इखारे वणी – तालुक्यातील कायर येथील अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेला प्रशांत व त्याच्या आईवडिलांनी शेतमजुरीचे काम करून मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सारखी त्यांची धडपड व तीन एकराच्या शेतात काबाडकष्ट करणाऱ्या आईवडिलांचे स्वप्न साकार करणारा प्रशांत ए एस ओ मध्ये राज्यातून प्रथम आला आहे. वणी तालुक्यातील कायर या गावांमध्ये प्रशांतने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत त्यानंतर विवेकानंद विद्यालय कायर तर उच्च माध्यमिक एस पी एम विद्यालयातून पूर्ण केले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने पुणे गाठले होते त्या ठिकाणी प्रशांतने स्पर्धा परीक्षांची तयारी करून स्पर्धेत यश मिळविले आज तो ए एस ओ मध्ये याज्यातून प्रथम , एस टी आय मध्ये तिसरी रँक, तर पी एस आय मध्ये निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व गावकऱ्यात उत्साहाचे वातावरण आहे. प्रशांतचे वडील बिंबिसार निखाडे यांची परिस्थिती अगदी हलाखीची त्यात त्यांना तीन मुले त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आईवडिलांनी तीन एकर असलेल्या शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करून मुलांचे शिक्षणासाठी पैसा पाठवायचे व दिवसेंदिवस महागाई व शिक्षणाचा खर्च त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत वडिलांची जिद्द माझ्यामुलांचे शिक्षण झालेच पाहिजे असा त्यांचा ध्यास होता व आज त्यांच्या लहान मुलाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून जिद्दीने परिश्रमाने मेहनतीने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले त्यामुळे त्यांच्या आईवडिलांना प्रचंड आनंद झाला आहे हा आनंद एक अविस्मरणीय क्षण आहे त्यांनी आमच्यासाठी उपसलेल्या कष्टमुळे मी या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले असे प्रशांत म्हणतो . या प्रशांतच्या यशाने गावात व जिल्हापरिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहे त्यामुळे गावकऱ्यात व मित्र परिवारात उत्साहाचे वातावरण आहे. तो आपल्या यशाचे श्रेय आईवडिल व गुरुजनांना देतो आहे