अडेगाव येथील कोंबड बाजारावर मुकुटबन पोलिसाची धाड….
सात आरोपी पोलिसांच्या ताब्यात…..
प्रशांत जुमनाके/ झरी तालुक्यातील अडेगाव येथील शेत शिवारात सार्वजनिक काही इसम कोंबड्यांचे हार जितीचे खेळ खेळत असल्याची माहिती मुकुटबन पोलिसांना गुप्तहेरांकडून मिळाली असता तत्कालीन घटना स्थळी जाऊन मुकुटबन पोलिसांनी धाड टाकली या धाडीत सात आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहेत. यातील आरोपी अमोल आनंदराव मत्ते वय ४२ वर्ष रा.आनंदनगर वणी, सुनिल अशोक आवारी वय ४८ वर्ष रा. अडेगाव,बाबाराव नानाजी हिवरकर वय ४८ वर्ष रा. अडेगाव, शिवराम गुलाब गिरसावडे वय ६० वर्ष रा.डोंगरगाव, वामन अर्जुन धानोरकर वय ४० वर्ष रा. अडेगाव, विठ्ठल उद्धव झाडे वय ५१ वर्षे रा. अडेगाव, निलेश लक्ष्मण आत्राम वय ३१ वर्षे रा. रामपुर , त. झरी (जामणी), जिल्हा यवतमाळ यांना पोलिसांनी पकडले. सदर घटना स्थळी दोन कोंबडे ज्याचे पायाला धारदार टोकदार काती बांधून त्यांची झुंज लाऊन. त्यावर हार जीत चा जुगार खेळताना मिळून आले. आरोपीचे अंगझडतीत एकूण १४०० रू नगदी तसेच एक जिवंत कोंबडा किंमत १००० रूपये , दोन टोकदार काती १०० रू किमतीचे तसेच घटनास्थळावर आरोपींच्या दुचाकी आढळून आल्या . त्यात एक बजाज पल्सर दुचाकी क्रं.MH34AK9683 अंदाजे किंमत ३०,००० रू, हिरो होंडा MH29N 5629 अंदाजे किंमत ३०,००० रू, स्प्लेंडर MH29AA1557 अंदाजे किंमत ३०,००० रू, स्प्लेंडर MH29AL7178 किंमत अंदाजे ३०,००० रू, पॅशन प्रो MH29AA1561 अंदाजे किंमत ३०,००० रूपये, MH29 AC3347 अंदाजे किंमत ३०,००० रू,फॅशन MH29AN5319 किंमत ३०,००० रू,याप्रमाणे असा वरील सात नमूद आरोपीकडून जुगार खेळाचा एकूण २,१२,५०० रू चां माल जप्त करण्यात आला. सर्वत्र मुकुटबन पोलिस स्टेशन येथे फिर्यादी ग्रेट पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम गंगाधर घोडाम यांचे फिर्यादीवरून गुन्हा रजि नं. ४५०/२०२२ कलम 1२( ब ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाही माननीय पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान ग्रेट पोलीस उपनिरीक्षक खुशाल सुपर ग्रेट पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम घोडाम, संजय खांडेकर /१३२०, पो.ना.संदीप कुमरे,/८१७ यांनी केला आहे.