राज्यपाल कोश्यारी विरोधात वणी विधानसभा काँग्रेस कमिटीचा निषेध
सुरेंद्र इखारे वणी- वणी विधानसभा काँग्रेस कमिटी ,वणी शहर व तालुका काँग्रेस कमिटीने आज दिनांक 23 नोव्हेंबर2022 रोज बुधवारला सकाळी 11.30 वाजता वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशारी व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधाशु त्रिवेदी यांनी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याने महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याने काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी चौकात घोषणाबाजी व नारे देत जाहीर निषेध नोंदवला . यावेळी वणी विधानसभा काँग्रेस कमिटी ,वणी शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष कुलसंगे, वसंतचे कार्यकारिणी संचालक प्रा डॉ शंकर वरहाटे , जिल्हा सेवादल अध्यक्ष राजू कासावार, महिला शहर अध्यक्ष सविता ठेपाले, डॉ महेंद्र लोढा, विकेश पानघाटे, प्रमोद लोणारे, डॅनी सँडरवार, ओम ठाकूर,दिनेश पाऊनकर, सुधीर खंडाळकर तसेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते.