कृषी विभागामार्फत वनराई बंधाऱ्याची बांधणी..
बातमीदार : प्रशांत डी. जुमनाके
नुकतेच झरी तालुक्यातील कृषी विभागामार्फत वनराई बंधारे बांधणी उपक्रम सर्वत्र राबवण्यात येत असून सदर सिंधी वाढोणा येथे गावातील गावकऱ्यांचे वतीने नाल्यावर वनराई बंधारे उभारणी उपक्रम जगण जाधव साहेब कृषी अधिकारी झरी यांचे साहाय्याने गावाजवळील नाल्या लगत असलेल्या जागेवर गावकरी बांधवांच्या वतीने वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम राबवण्यात आला. वनराई बंधारे बांधून पाणी अडवा , पाणी जिरवा, असा उपक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत. तरी या बंधारे उभारणी करिता सिंधी वाढोना येथील क्रीडा मंडळाच्या तरुणाचे सहकार्याने तथा कृषी अधिकारी साहेब यांचे उपस्थितीत वनराई बंधारे बांधणी उपक्रम पार पडला त्यावेळेस उपविभागीय कृषी अधिकारी जगण राठोड व गावातील सिंधी वाढोना येथील शिवाजी क्रीडा मंडळ चे युवक मंगेश मोहितकर, गजानन निखाडे, कैलास निखाडे, नंदकिशोर निखाडे, निखिल महकुलकार, सुमित बुरडकार,गणपत आवारी, मारोती घुगुल, राम गायकवाड हे उपस्थित होते.