-1.3 C
New York
Friday, March 1, 2024

वणीच्या गांधी चौकातील 160 गाळ्यांचा लिलाव

वणीच्या गांधी चौकातील 160 गाळ्यांचा लिलाव

 

 

 

उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा आदेश  

लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन    

   सुरेंद्र इखारे वणी – येथे गांधी चौकात असलेल्या नगर परिषदेच्या 160 दुकान गाळेभाडे तत्वावर ई- लिलाव पध्दतीने हरास करण्यासाठी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने रिट पिटीशन क्रमांक 181/2020 चे आदेशान्वये गांधी चौकातील गाळेलिलाव करण्याबाबत आदेशीत केले आहे.           उच्च न्यायालयाचे आदेशात अधीन राहून वणी शहरातील शी.न. 19 अ व 19 ब गांधी चौकामधील एकूण 160 दुकान गाळेभाडे तत्वावर दे यासाठी ई- लिलाव करायचा आहे. सदर दुकान गाडे करिता निश्चित करण्यात आलेले मासिक भाडे स्थिर ठेवून अनामत रक्कमेवर इ लिलाव करण्यात येईल. 160 दुकान गाडे भाडेपट्ट्यावर देण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 92(3) महाराष्ट्र नगरपालिका नियम 1983 स्थायी निर्देश क्रमांक 24 शासन निर्णयामधील अटी व शर्ती यास अधीन राहून ई-लिलाव प्रसिद्ध करण्यात आली आहे.     ई- लिलाव प्रक्रियेचा तपशील व दुकान गाडे भाडे पट्टीवर वाटप करण्याकरिता निश्चित केलेल्या भाडे विषयक, पात्रता विषयक, प्रत्येक गाळ्यांचा तपशील व इतर अटी व शर्ती नगर परिषद कार्यालय तसेच www. education.gov.i  या संकेत स्थळवर Auction- ID क्रमांक 2022 MH-15756 अन्वय दिनांक 25 नोव्हेंबर 2022 पासून सकाळी 11.00वाजता पासून उपलब्ध आहे.  तेव्हा  शहरातील नागरिकांनी व लिलावधारकांनी अटी व शर्ती काळजी पूर्वक वाचाव्यात कारण गाडे बोली अनामत रक्कम प्रति गाडे 50000/- रुपये ,ई-लिलाव फी प्रति गाडे 2000/- रुपये आहे.        ई-लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेण्याकरिता Digital signature certificate (DSC) असणे आवश्यक आहे.     ई-लिलावात सहभागी होण्यासाठी पात्रता मिळविणे ,ई-लिलावात पात्रता ठरविण्यासाठी कार्यालयीन कालावधी, ई-लिलाव पात्र झाले नंतर प्रत्येक्ष ई -लिलावात बोली बोलणे  ग्रुप A-40, ग्रुप B-40,   ग्रुप C-40, ग्रुप D-40 असे एकूण 160 गाड्यांचा लिलाव होत आहे . तेव्हा शहरातील नागरिकांनी गाळे लावाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. समजा लिलावधारकाना लिलाव प्रक्रियेबाबत काही शंका किंवा अडचणी असल्यास संपर्क साधावा असे मुख्याधिकारी अभिजित वायकोस व प्रशासक नगर परिषद यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News