त्या हिंस्र वाघाचा बंदोबस्त करा…..
राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने वनमंत्र्याला निवेदन……
प्रशांत जुमनाके वणी : तालुक्यातील परिसरात सद्या स्थितीत हिंस्र वाघाचा शिरकाव झाला असून हा प्राणी मानवाला धोका पोचवत आहेत.त्यामुळे सर्वत्र वणी तालुक्यात व खेडे विभागातील लोकांच्या मनात भीतीचे वातावरणात पसरले आहे. शेतकरी यांचा हंगामी शेतीची कामे चालू असल्याने शेतकऱ्याच्या मनात भीती चे वातावरण पसरले जात आहे. सदर शेतकरी शेतात जाण्यास भित आहे. तर शेतीचे काम करावीत तर कधी हा पेच शेतकऱ्यांसमोर पडला आहेत,कापूस वेचणी चालू असून
अशातच वाघांनी सर्वत्र दहशत पसरली आहे. परिसरातील लेबर वर्ग , जिमिंग, कोलवासरी, मध्ये कामाला जात असतानी जीव मुठीत धरून जात अतिशय धोक्याचे होत असल्याने या हिंस्र वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने करण्यात आली असून सदर १५ दिवसा त वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस चे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनातून देण्यात आला.