यवतमाळात इनामी काटा कुस्त्यांची दंगल संपन्न
लाखो रुपयांची जंगी लूट
सुरेंद्र इखारे वणी – स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ भव्य इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल 25 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता श्री हनुमान आखाड्याच्या प्रांगणात यवतमाळ येथे जिल्हा कुस्तीगीर संघाने आयोजित केली होती . यवतमाळ येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती भव्य इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल ही निःशुल्क प्रवेश असल्याने यवतमाळ जिल्हा व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील पहेलवान पटूंनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वेगवेगळ्या गटांमध्ये इनामी काटा कुस्त्यांची दंगल केली यामध्ये लाखो रुपयांची जंगी लूट करण्यात आली ही दंगल पाहण्यासाठी 100 ते 150 किलोमीटर अंतरावरून कुस्ती चे शौकीन नागरिकांनी उपस्थिती लावली यावेळी प्रत्येक कुस्तीच्या वेळी कुस्तीच्या हौदात दोन मल्लना आशीर्वाद देण्यासाठी मान्यवरांमध्ये प्रफुल मानकर, मनीष पाटील , उपस्थिती होते या खेळात लहान गटापासून तर मोठ्या गटांचे मल्लानी भाग घेतला होता . या इनामी काटा कुस्त्यांच्या दंगलीसाठी यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर , प्रशांत बाजोरिया, उद्धव बाकडे, रवींद्र ढोक, अब्दुल जकीर, आनंद जाधव, विठ्ठल भोयर, हित मिश्रा, कदिर बेग मिर्झा, सुरेश लोहना, शरद बजाज, गणेश तोटे, किसन डबारे, प्रमोद निकुरे, दादा राऊत व हनुमान आखाड्याच्या पहेलवानाणीं परिश्रम घेतले.