-1.3 C
New York
Friday, March 1, 2024

वसंत जिनिंगचे कार्यकारी संचालक प्रा.डॉ.शंकररावजी वऱ्हाटे साहेब यांचा सत्कार

वसंत जिनिंगचे कार्यकारी संचालक प्रा.डॉ.शंकररावजी वऱ्हाटे साहेब यांचा सत्कार

सुरेंद्र इखारे वणी- येथील विवेकानंद विद्यालयाच्या सभागृहात दि वसंत जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरीच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल तसेच कार्यकारणीत कार्यकारी संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेचे  उपाध्यक्ष डॉक्टर शंकररावजी वऱ्हाटे साहेब  यांचा  सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री रामकृष्ण विवेकानंद मंडळाचे अध्यक्षा श्रीमती ताराबाई ठावरी ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्कारमूर्ती माननीय डॉक्टर शंकररावजी वऱ्हाटे, मंडळाचे सन्माननीय सचिव श्री अविनाश भाऊ ठावरी, मंडळाच्या संचालिका व विद्यालयाच्या पर्यवेक्षिका माननीय सौ. वंदनाताई वऱ्हाटे मॅडम, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिलीपराव आसकर सर व ज्येष्ठ शिक्षक श्री नगराळे सर व्यासपीठावर उपस्थित होते.     यावेळी  वसंत जिनिंगचे कार्यकारी संचालक म्हणून प्रा डॉ शंकरराव वऱ्हाटे यांची निवड झाल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती ताराबाई ठावरी यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच  श्री रामकृष्ण विवेकानंद मंडळ वणी व विवेकानंद विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला श्री रामकृष्ण विवेकानंद मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन श्री संतोष म्हसे सर यांनी केले तर आभार  देवानंद गेडाम सर यांनी मानले .

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News