एन बी एस ए कॉलेज मध्ये भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा.
सुरेंद्र इखारे वणी. – .येथील एन बी एस ए आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज मध्ये भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. एन बी एस ए आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज मध्ये भारतीय संविधान दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राणानूर सिद्धिकी, मुख्य मार्गदर्शक यशवंत शितोळे अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र, अतिथी प्राचार्य डॉ. रोहित वनकर ऍड. हुमेरा उपस्थित होते. यशवंत शितोळे यांनी भारतीय संविधानातील तरतुदीचे विवेचन करून प्रत्येक भारतीय नागरिकांच्या जीवनातील भारतीय संविधानाचे महत्व विशद करून करिअर कट्टा च्या माध्यमातून भारतीय संविधानाचे पारायण नियमितपणे घेऊन विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने सांगितले जाते असे मत व्यक्त केले.
डॉ. राणानूर सिद्धिकी यांनी अध्यक्षीय विचार व्यक्त करताना सांगितले की भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव प्रत्येक नागरिकांमध्ये असायला हवी असे मत व्यक्त केले.
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा.गणेश शेडमाके यांनी केले यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते