क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात संविधान दिवस साजरा
सुरेंद्र इखारे वणी – भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे व लोकशाही पूरक असे संविधान असून जातीयतेच्या बेड्या तोडून संविधानाने भारत जोडूया असे प्रतिपादन मा.भाऊसाहेब आसुटकर यांनी केले. मराठा सेवा संघ, सावित्रीबाई फुले वाचनालय व ओबीसी विचार मंच वणी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, वणी येथे आयोजित ‘संविधान दिवस’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मा.मोहनराव हरडे यांनी उपस्थित्यांना भारताच्या संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब राजुरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.मोहन हरडे आणि मा.भाऊसाहेब आसुटकर होते. अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब राजूरकर यांनी सर्व समाजातील नागरिकांना स्वातंत्र्य, समता,बंधुत्व व न्याय देण्याची भूमिका संविधानाने घेतल्यामुळे सर्व सामान्य माणूस विकसित झाला, त्यामुळे आपल्या देशाच्या विकासात संविधानाचे योगदान असल्याचे सांगितले. यावेळी वाचनालयाचे संचालक सुरेंद्र घागी, मारोती जीवतोडे, विनोद बोबडे, नारायणराव मांडवकर, अनिलकुमार टोंगे, वसंतराव थेटे, नितिन मोवाडे, सुरेशराव राजुरकर आणि वाचनालयातील वाचक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव विजय बोबडे तर आभार प्रदर्शन वाचनालयाचे सहाय्यक ग्रंथपाल शुभम कडू यांनी मानले.*