25.9 C
New York
Monday, June 24, 2024

मृतावस्थेत असलेल्या जलशुद्धीकरन केंद्राचे  नूतनीकरण करण्याची मागणी   

मृतावस्थेत असलेल्या जलशुद्धीकरन केंद्राचे  नूतनीकरण करण्याची मागणी     

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिले मुख्याधिकारी अभिजित वायकोस याना निवेदन   

कार्यवाही न झाल्यास मनसे सहित जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याचा इशारा     

  सुरेंद्र इखारे वणी – नगर पालिकेच्या मृत जलशुद्धीकरनाचे नूतनीकरण करून जनतेला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबतचे निवेदन मनसेचे शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांनी मुख्याधिकारी अभिजित वायकोस याना दिले आहे.            आज  वणी शहर हे संपूर्ण महाराष्ट्रात वैभवशाली शहर म्हणूंन ओळखल्या जात आहे . शहरात व परिसरात मोठमोठे व्यवसाय आहे. त्यामुळे शहरामध्ये वणी वासीयांच्या  व्यतिरिक्त इतरही लोक वास्तव्यास आहे. विधानसभा क्षेत्रातील वणी शहर सर्वात मोठे शहर आहे .त्यामुळे  वणी ही  नगर परिषद  या नगर परिषदेची मतदार संख्या जवळपास 47 हजाराचे वर आहे . वणी शहरात विविध व्यावसायिक गाळे व शहरात असलेली घरे यामधून नगर परिषदेला कोट्यवधींचा कर मिळतो . याव्यतिरिक्त शासनाकडून  सुद्धा नगर परिषदेला निधी मिळतो. असे असताना सुध्दा महाराष्ट्रातील वैभवशाली ओळख असलेल्या शहरात नगर परिषद प्रशासन जनतेच्या जीवावर उठलेली दिसून येत आहे.  त्यात प्रामुख्याने शुद्ध पिण्याच्या पाण्याची बाब लक्षात घेता  अनेक वर्षांपासून जलशुद्धीकरण केंद्र मृत अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे  वणी शहरातील नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. अशुद्ध पाण्यापासून होणाऱ्या आजारामुळे सर्व जनता त्रस्त झाली आहे.   ही बाब माहीत असून सुद्धा हेतुपुरस्सर पणे नगर पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही लाजिरवाणी बाब आहे. व आपल्या जबाबदारीचा विसर पडला हे आपल्या कृतीतून दिसून येत आहे हे स्पष्ट होते.      आपणास नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा कुठलाच अधिकार नाही तेव्हा आपण शहरातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्वरित जलशुद्धीकरण केंद्र उभारून जनतेला शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी . असे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना  सहित जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी . अशी तंबी देत  या गँभिर प्रश्नावर काय कार्यवाही कराल त्याची लेखी स्वरूपात माहिती द्यावी असे मुख्याधिकारी अभिजित वायकोस याना निवेदनातून सांगण्यात आले आहे . यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष शिवराज पेचे, गीतेश वैद्य उपाध्यक्ष, अर्चना बोदाडकर महिला जिल्हा अध्यक्षा, वैशाली तायडे, लकी सोमकुंवर, शंकर पिंपळकर, श्रीपाद धोटे, लोकेश लडके, रुचिर वैद्य, अनिकेत पिदूरकर, शुभम आवारी, सूरज भिवलकर, मनोज पुराणकर, उपस्थित होते. [ जलशुद्धीकरण केंद्राच्या पाईप लाईनचा प्रस्ताव पाठविला आहे जेव्हा या प्रस्तावाला मंजुरात मिळेल तेव्हा दखल घेतल्या जाईल असे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी निवेदन कर्त्याना सांगितले]

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News