वणी ,मानकी, पेटूर ,उमरी या रस्त्याची थातुरमातुर डागडुगजी
रस्ताबांधकाम लोकप्रतिनिधींला लक्ष घालण्याची गरज
सुरेंद्र इखारे वणी – वणी ते पुरड या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची शासनाने दखल घेत शासनाचे बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे लगेच कामाला सुरुवात करून वणी, माणकी व पेटूर व काही भाग उमरी पर्यंत डागडुगजीचे काम सुरू होते परंतु ही रस्त्याची डागडुगजी थातुरमातुर असल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्यांना डागडुगजीवर टाकलेल्या चुरीमुळे स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच चार बाय चारच्या खड्ड्याची डागडुगजी करून सुद्धा रोडची लेव्हल येत नसल्याने खचका पडून वाहनांचे नुकसान त्यासोबतच वाहन चालकाला स्पॉंडेलिसिस झाल्याशिवाय राहणार नाही. inतेव्हा शासनाने कमीत कमी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची डागडुगजी करीत असताना खड्डा पूर्णतः बुजवून रस्त्याची लेव्हल देण्यात यावी तसेच बीबीएम ची लेअर चढविण्यात यायला पाहिजे होते परंतु तसे झालेले नाही बीबीएम ची लेअर चढविली असती तर रस्त्याला थोडी लाईफ मिळाली असती वास्तविक पाहता या राज्य मार्गावर नियमितपणे डागडुगजी चे काम सुरूच असते परंतु यावर्षी 5875.00लक्ष खर्च करण्यात आले आहे मात्र रस्ता तसाच तेव्हा शासनाच्या बांधकाम विभागाच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे असे या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांकडून बोलल्या जात आहे तेव्हा शासनाने रस्त्याच्या डागडुगजी कडे त्वरित लक्ष घालावे अशी अपेक्षा नागरिकांकडून होत आहे