12.9 C
New York
Monday, May 20, 2024

वाघाचा वावर असणाऱ्या गावा सभोवताल विद्युत दिवे लावण्याची मागणी

वाघाचा वावर असणाऱ्या गावा सभोवताल विद्युत दिवे लावण्याची मागणी।   

गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन    

  सुरेंद्र इखारे वणी –  तालुक्यात वाघाचा वावर असल्याने गावा सभोवताल विद्युत दिवे लावण्याच्या मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती वणी याना दिले आहे .     तालुक्यामध्ये खाणी लागत असणाऱ्या गावांमध्ये मागील एक महिन्यापासून वाघाने धुमाकूळ घातल्याने गावकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील भुरकी(रांगणा) ,कॉलरा ,पिंपरी येथील शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून दोन इसमाना ठार केले आहे. तसेच ब्राम्हणी येथील मजुरांवर हल्ला करून गँभिर जखमी केले. इतकेच नव्हे तर परिसरातील शेतकऱ्यांचे बैल, गाय, बकऱ्या अशी अनेक जनावरे ठार केली आहे त्यामुळे गावकरी भयभीत झाली आहेत. वे को ली ने गावसभोवताल मातीचे ढिगारे केल्याने त्यावर फोसेफिसचे जंगल झाल्याने वाघाचा वावर आहे त्यामुळे वाघाचा अंदाज येत नाही . रात्रीच्या वेळेस घरा बाहेर कसे जायचे व घरात पाळीव प्राणी असल्याने त्यांना गोठ्यात बांधणे सोडणे हे दैनंदिन काम आहे. त्यासाठी गावा सभोवताल विद्युत प्रकाशाची आवश्यकता आहे .   वणी तालुक्यातील वाघाची दहशततीत असणाऱ्या गावांमध्ये, कोलेरा, पिपरी, पिंपळगाव, जुनाड, बोरगाव, उकणी, भालर, निळापूर,ब्राम्हणी, कोणा, सावरला, नायगाव, रांगणा, भुरकी, निलजइ, तरोडा, निवली, बेलोरा, कवडशी, नायगाव, शेवाळा, सवनगी, शिवानी, मुंगोली, माथोली, जुगाड, साखरा,चिखली,टाकली, येणाडी, कुर्ली, कळमना, परमडोह, चनाखा, हनुमान नगर, येनक, चिंचोली, पुरड,शेलू, वारगाव ,चारगाव,शिरपूर,गोपाळपूर, खांदला,केसुरली, मंदर, शिंदोला, या परिसरामध्ये आळीपाळीने शेतकरी शेतमजूर ग्रामस्थांना वाघाचे दर्शन होत आहे. अशा आपत्तीच्या प्रसंगी स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमुख या नात्याने संबधीत गावाच्या सरपंच व ग्रामसेवका ची बैठक लावून सुरक्षेच्या दृष्टीने गावभोवताल विद्युत दिवे लावून प्रकाशित करणे सोबतच सुरक्षेच्या दृष्टीने अन्य उपाययोजना व जनजागृती करून मानवी जीवन सुरक्षित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे अशी मागणी केली आहे संबंधित निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जी प यवतमाळ याना देण्यात आली आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News