वणीत विविध कार्यक्रमातून कौमी एकता सप्ताह साजरा
नगरपरिषद शाळांचा पुढाकार
सुरेंद्र इखारे वणी- महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभागामार्फत कौमी एकता सप्ताह साजरा करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार नगर परिषद वणी कडून कौमी एकता सप्ताह नियोजित विविध कार्यक्रमांनी 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात आला.
या सप्ताहाची सुरुवात नगर परिषदे मध्ये व नगर परिषद वणीच्या सर्व 11 शाळांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन करण्यात आली. 20 नोव्हेंबरला अल्पसंख्यांक कल्याण दिवस साजरा करण्यात आला. दि. 21 नोव्हेंबरला भाषिक सुसंवाद दिनी नगर परिषद व नगर वाचनालय यांच्या माध्यमातून नगर व वाचनालायत कवी संमेलन घेण्यात आले. या कवी संमेलनात धनराज मेश्राम, अभिषा गौरकार, शंकर घुगरे, परशराम त्रिवेदी, मीनाताई किलावत, सागर बरशेट्टीवार, स्मिता गोरंटीवार, अविनाश पालवे, जयंत सोनटक्के अभय पारखी या कवींनी राष्ट्रीय एकात्मता या विषयावर स्वरचित कविता सादर केल्या.
या संमेलनाचे अध्यक्षस्थानी माधव सरपटवार हे होते. प्रास्ताविक उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांनी केले. सूत्रसंचालन गजानन कासावार यांनी केले. आभार अभय पारखी यांनी मानले.
दि. 24 नोव्हेंबरला नगर परिषदेच्या सर्व 11 शाळांमध्ये महिला मेळावा घेऊन भारतीय समाजातील महिलांचे महत्व व राष्ट्र उभारणीच्या कामामधील त्यांची भूमिका या विषयावर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. दि. 25 नोव्हेंबरला जोपासना दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाची जोपासना व त्याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी पर्यावरणाची जोपासना या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी नगर परिषद शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे, मुख्याध्यापक गजानन कासावार, किशोर परसावार, वसंत आडे, अविनाश पालवे, उमाताई राजगडकर, वसंत गोरे, रविकिरण आत्राम, किशोर चौधरी, दिलीप कोरपेनवार, रेशमा शाह, फहीम बानो यांनी परिश्रम घेतले.