19 C
New York
Saturday, May 18, 2024

कायर ग्रामपंचायतीची निवडणूक तिरंगी

कायर ग्रामपंचायतीची निवडणूक तिरंगी

  * कायरचा सरपंच कोण ?  *      

  सुरेंद्र इखारे वणी –  तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 18 डिसेंबरला होऊ घातली आहे. यामध्ये सरपंचाची निवड थेट जनतेतून असल्याने सर्व राजकीय पक्षांनी दमदार व सक्षम नेतृत्वासाठी सरपंच उमेदवार व सदस्यांची निवड करून उमेदवारी दाखल केली आहे त्याच बरोबर या राजकीय पक्षांच्या विरोधात   अपक्षांने सरपंचा सहित सदस्यांचे दमदार पॅनल उभे ठाकल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणूकित चुरस निर्माण करून  तिरंगी लढत दिसून येत आहे.        कायर ग्रामपंचायतीच्या 9 जागेसाठी 27 सदस्यांनी तर सरपंचाच्या एका जागेसाठी तिघांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे कायर ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचे , शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे , तर अपक्ष सुध्दा मागे न राहता  सरपंच व सदस्यासहित  दावेदारीसाठी उभे आहे.आज छाननीत किती नामांकन अवैध ठरणार याकडे लक्ष लागले आहे . कायर  ग्रामपंचायतमध्ये 28  सदस्यानी उमेदवारी दाखल केली आहे.यामध्ये अपक्ष उमेदवार दमदार असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत असल्याची गावात चर्चा असल्याने मतदारात राजकीय पक्षबाबतचा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी असून चुरशीची होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या निवडणुकीत 3 केंद्र असून या केंद्रावर 2 हजार 700 मतदार मतदान करणार आहे त्यामुळे मतांचे विभाजन होऊन चुरस निर्माण होईल असे बोलल्या जात  आहे. 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News