वणी आदीलाबाद राज्यमार्गावरील कायर रस्त्यावर स्पीडब्रेकरची मागणी
* कायर वासीयांनी दिले उपविभागीय अभियंत्याला निवेदन
सुरेंद्र इखारे वणी – वणी ते मुकुटबन आदीलाबाद राज्यमार्गावरील कायर हे गाव जडवाहतुकीच्या मार्गावर असून मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते .या राज्यमार्गावर स्पीडब्रेकर नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. तेव्हा शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी त्वरित कायर येथील राज्यमार्गावर स्पीडब्रेकर देण्यात यावे या मागणीचे निवेदन कायर ग्रामवासी नागेश धनकसार यांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम वणी याना दिले आहे. कारण वणी , मुकुटबन ,पाटण ते आदीलाबाद या राज्यमार्गावर कोळसा वाहतु, सिमेंट वाहतूक, व डॉलमाईतची वाहतूक मोठ्या प्रमाणात जडवाहतुक होत असल्याने अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे. या राज्यमार्गावरील बरीचशी गावे वाहतुकीच्या रस्त्यावर आहे तसेच कायर हे गाव रस्त्यावर असून ऐतिहासिक बाजारपेठ आहे त्यामुळे या गावाशी परिसरतील 40 गावाचा आर्थिक व्यवहार होत असून शालेय शिक्षण घेण्यासाठी परिसरातील विद्यार्थी येथे येतात त्यामुळे या वर्दळीच्या रस्त्यावर स्पीडब्रेकर ची आवश्यकता आहे तेव्हा शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित कायरच्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर स्पीडब्रेकर बांधण्यात यावे अशी मागणी नागेश धनकसार, कुंदन टोंगे, रियाज सैययद, राहुल खरवडे, सुभाष पीठलावार, अमोल आक्केवार, गणेश गोंडलावार, संतोष पिठलावार, आशिष पेंदोर, नितेश आत्राम, शिवराज महाकुलकार, अजय गारघाटे, गंगाराम, मेश्राम, संदीप गुरनुले, महेश गुरनुले, सचिन मोहूर्ले व समस्त ग्रामवासीयांनी केली आहेत.