-1.3 C
New York
Friday, March 1, 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्य निवली निराधार शिबिर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्य निवली निराधार शिबिर

ता. ६ डिसेंबर २०२२ ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत वंचित निराधार लोक कल्याण अभियायाअंतर्गत गाव तिथे निराधार लाभार्थी निवड व व्यसनमुक्ती शिबीराचे आयोजन..

प्रशांत डी. जुमनाके / वणी 

वणी :- येथून जवळच असलेल्या निवली येथील ग्राम पंचायत कार्यालयामध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित निराधार लोककल्याण अभियान उपक्रमाअंतर्गत निराधार लाभार्थी निवड व व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन ता. ६ डिसेंबर रोजी दु. १२ वाजता करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडी, श्रीगुरुदेव सेना व निर्मिती बहुद्देशीय संस्था यांचा संयुक्तरित्या वंचित निराधार लोककल्याण अभियान अंतर्गत गाव तिथे निराधार लाभार्थी निवड व व्यसनमुक्ती शिबिर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन ता.६ डिसेंबर २०२२ ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती अर्थात ग्रामजयंती ता. ३० एप्रिल २०२३ पर्यंत हा उपक्रम वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा अध्यक्ष तथा श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांचे माध्यमातून राबविण्यात येत आहे . या उपक्रमाची सुरवात मौजा निवली येथून सुरू होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित मान्यवर ग्राम पंचायतीचे सरपंच बबनराव वाटेकर, उपसरपंच पवन खिरडकार,ग्राम पंचयत सदस्य अनिल खाडे, सौ.मेघाताई गोवरदीपे, सौ. मनीषाताई मोहितकर, सौ. रुपालिताई काकडे, सौ. प्रतीक्षाताई मोहितकर, पोलीस पाटील किशोर ताजने, सोसायटी अध्यक्ष मंगल बलकी, तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश ताजने (राजू) , माजी सरपंच केशवजी उलमाले,शाळा सुधार समितीचे अध्यक्ष रामकीसन ताजने, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

वणी बातमी

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News