तेजापूर येथील स्व.विट्ठल पाटील मांडवकर विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
प्रशांत जुमनाके वणी – स्व. विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालय तेजापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा महापरिनिर्वाण दिन व विठ्ठल पाटील मांडवकर यांची पुण्यतिथीचा कर्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रकाश गारघाटे हे होते . यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती पिंपळकर यांनी केले. या वेळी शाळेतील शिक्षक मदन मडावी , नयन नंदूरकर यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी शाळेचे शिक्षक श्री. प्रकाश गारघाटे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु श्रेया मालेकर हिने केले तर आभार ऐश्वर्या गिरसावळे हीने मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. गजानन मालेकार, विजय मांडवकर, संतोष मालेकार व प्रवीण विधाते यांनी सहकार्य केले.