*एक वाघ पकडण्यात वनविभागाला यश*
*अखेर चौदा दिवसात एक वाघ जेरबंद*
*बाकी वाघाचा वावर कायम*
*वाघाची ओळख पटवण्यास वनविभाग अनभिज्ञ*
सुरेंद्र इखारे वणी- : गेल्या नोव्हेंबर महीण्यात पंधरा दिवसात वाघाने तीघावर हल्ला चढवून दोघाला ठार केले व एकाला जखमी केले होते.वणी विधान सभा क्षेत्राला लागूनच वनविभागाचे संरक्षित क्षेत्र आहे.त्या भागातून हे वाघ येतात हे सर्वश्रुत आहे.त्यामुळे पाळीव प्राण्याचे बरोबरच मनुष्य प्राणीही बळी जाण्याचे किस्से नवीन नाहीत म्हणूनच या वणी वनपरिक्षेत्रात वाघाने चांगलीच दहशत माजवली आहे.
माजरीतून या वाघाने 9 तारखेला वर्धा नदी पार करून अभयचा बळी घेतला. तेव्हापासून वणी वनपरिक्षेत्रातील खरा वाघाचा कारनामा सुरू झाला होता.
या वाघाने वणी वनपरिक्षेत्रात प्रवेश केल्याचे वनविभागाला कळविले होते पण या आधी आधिवास असलेल्या पांढरकवडा वनपरिक्षेत्रातून नरभक्षक वाघाची ओळख देण्यात आली नव्हती आज एका वाघाला पकडण्यात आले तो हाच नरभक्षक वाघ आहे की दुसरा आहे याबाबत अजूनही उलगडा झाला नाही.उकणी वेकोलि परीसरात बरेच वाघ आढळले आहेत. त्याचाही थांब पत्ता शोधण्यास वनविभाग अपयशी ठरत आहे.
अभयला ठार करणारा तोच नरभक्षक वाघ वणी येथील दामोदर नगर येथील असलेल्या मलीक चिकन सेंटरच्या एका सिसिटीव्ही कॅमेरात मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास कैद झाला होता. याच वाघाने ब्रामणी शिवार गाठून उमेश ला जखमी केले. या नंतर कोलेरात रामदासचा बळी घेतला होता.या नरभक्षक वाघाला वेकोलिच्या सहाय्याने निर्माण झालेल्या काटेरी झुडपाने आश्रय मिळत आहे. या भागात वाघाने लपंडाव खेळत आपला वावर कायम ठेवला व बाकी वाघाच्या कळपात हा नरभक्षक वाघ मिसळून गेला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
रामदासचे अर्धे खाल्लेले शरीर बघून तेथील कास्तकार मजुर चांगलेच भयभीत झाले होते. तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी शेतमजूर शेतीत जावयास धजावत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभाग डोळ्यात तेल टाकून या भागात गस्त वाढवून फौजफाटा घेऊन पिंजरे घेऊन अनुभवी रेस्कू टिमला हाताशी धरून आज एका वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले असून वनविभागाच्या कामगीरीने जनतेत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पण जेरबंद करण्यात आलेला वाघ कोणता आहे याची मात्र ओळख अजून गुलदस्त्यात आहे. या भागात दहा ते बारा वाघाचा वावर असल्याचे बोलले जात आहे.नरभक्षक वाघ कोणता आहे हे अजून समजले नाही. या भागात तिन वर्षापासून दबा धरलेले वाघ व त्यांचे पिल्ले बरेच आहेत. तरी लवकरात लवकर सर्व वाघावर अंकुश लावण्यात वनविभागाला यश मिळावी अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.