-1.3 C
New York
Friday, March 1, 2024

मागासवर्गीयांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील- अहिर

मागासवर्गीयांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील- अहिर

शिवाजी महाराजांचा अपमान करणारे मूर्खांच्या नंदनवनात

जयंत साठे नागपूर प्रतिनिधी  –    केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेल्या योजनांचा लाभ या राज्यातील लोकांना कसा मिळेल, यासाठी काम करण्याचा अधिकार आयोगाला दिलेला आहे. त्यावेळच्या सरकारने आयोगाला अधिकार दिले नव्हते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेप्रमाणे विषमता संपवणे आणि सर्वांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आता आयोगातर्फे केला जाणार आहे. विद्यार्थी, कामगार, मजूर सर्वांनाच न्याय देण्याचे काम केले जाणार आहे, असे केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर म्हणाले.
केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर प्रथमच ते नागपुरात आले असताना विमानतळावर पत्रकारांशी होते. कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी वणीचे न.प. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ओबीसी आणि मराठा बांधवांबाबत ताबडतोब निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. सरकारमध्ये विधिमंडळात जसे ठराव पारित होतात, त्याप्रमाणे आयोगाला निर्णय घ्यावे लागतात. हे प्रस्ताव केंद्राकडे पाठवले जातात. त्यानंतर पुढील प्रक्रिया होते. सद्यःस्थितीत देशभरातून ४० प्रस्ताव आलेले आहेत. या प्रस्तावांना तात्काळ न्याय द्यायचा आहे. मराठा आरक्षणाबाबत सध्याच काही सांगता येणार नाही. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणारे अतिशय मूर्ख लोक आहेत. असे त्यांनी राज्यपालांचे नाव न घेता स्पष्ट केले.त्यांना शिवाजी महाराज कळलेलेच नाहीत. महान युगपुरुषाचे महत्व त्यांना समजलेले नाही. हे विकृत लोक आहेत. त्यामुळे अशा मूर्खांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. प्रधानमंत्री मुंबईत महाराजांच्या स्मारकासमोर नतमस्तक झालेले आहेत. शिवाजी महाराज हे राज्यातील, देशातीलच नाही तर जगात मान असलेले व्यक्तिमत्त्व आहेत, असे हंसराज अहीर यांनी सांगितले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News