“श्री गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालयाचे सुयश*.
प्रशांत जुमनाके वणी – वणी येथील शासकीय मैदानावर पार पडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत शिरपूर येथील श्री गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. हे दोन्ही विद्यार्थी आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.
८०० मि. धावण्याच्या स्पर्धेत वर्ग १२ वी चा विद्यार्थी ओंकार महादेव देवाळकर हा प्रथम क्रमांकाने विजयी झाला आहे, तर ४०० मि. स्पर्धेत वर्ग १२ वी चा विद्यार्थी अविनाश भाऊराव थेरे हा द्वितीय क्रमांक घेऊन विजयी झाला आहे. या खेळाडूंना प्रा. सौ सिमा सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले.
वरील दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय टिकारामजी कोंगरे, सचिव सन्माननीय पुरुषोत्तम पाटील कोंगरे, संस्थेचे इतर पदाधिकारी, प्राचार्य श्री. मोतीराम परचाके, विद्यालयाचे व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.