19 ग्रामपंचायतीची 26 हजार 548 मतदार
सुरेन्द्र इखारे वणी – तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 18 डिसेंबरला होऊ घातली आहे. या निवडणुकीत 26 हजार 548 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीमधील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या मतदारांची संख्या खालीलप्रमाणे आहे. अहेरी 626, बोर्डा 1543, ब्राम्हणी 572, चारगाव 631, गणेशपूर 2024, कायर 2155, कुरइ 1186, मंडर 1802, मेंढोली 1427, रांगणा 744, साखरा दरा 1629, शिंदोला 1658, वारगाव 569, वरझडी 650, वेळाबाई 1450, पुरड 1027, केसुरली 483, चिखलगाव 5925, कळमना 647 अशी एकूण 19 ग्रामपंचायती मधील 13 हजार 815 पुरुष मतदार, तर 12 हजार 733 स्त्री मतदार असून एकूण 26 हजार 548 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदार 18 डिसेंबर ला मतदानाचा हक्क बजावणार आहे तेव्हा या निवडणुकीतचे काम निवडणूक अधिकारी तहसीलदार निखिल धुळधर, नायब तहसीलदार कापशिकर व इतर महसूल कर्मचारी तसेच राज्यशासनाचे कर्मचारी सहकार्य करून निवडणूक पार पाडणार आहे. तसेच 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर करण्यात येणार आहे.