कायर ग्रामपंचायतीमध्ये राजकीय पक्ष व अपक्षात काट्याची लढत
शिवसेना व काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठा पणाला
सुरेन्द्र इखारे वणी – तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 18 डिसेंबरला होऊ घातली आहे . यामध्ये परिसरातील अतिशय महत्वपुर्ण ग्रामपंचायत कायर आहे. या ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे . या गावा शेजारील पठारपूर हे गाव माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांचे असल्याने कायर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे . कायर या गावचे माजी पंचायत समिती सदस्य गोपालसिंग भादोरिया हे काँग्रेस पक्षाचे त्यामुळे या किल्ल्यात दोन राजकीय पक्षांच्या विरोधात अपक्षात काट्याची लढत होणार असे तरुण युवा ,प्रौढ वृद्ध मतदारातून बोलल्या जात असून सर्वत्र गावात चर्चा आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण अधिक तापायला लागले आहे. कायर ग्रामपंचायतीचे एक हजार 955 मतदार संख्या असून यामध्ये 990 पुरुष मतदार तर 965 महिला मतदात आहेत हे मतदार तीन केंद्रावर मतदान करणार आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेतृत्व गोपालसिंग भादोरिया, महेश देशमुख, व अन्य कांग्रेस पुढारी तसेच शिवसेना पक्षाचे नेतृत्व माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर तर अपक्षांचे नेतृत्व कायर येथील कुंदन टोंगे तरुण तडफदार यांच्यात काट्याची लढत दिसत आहे. या निवडणुकीत सर्व तरुण युवा पिढीनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने चांगलीच रंगत पहावयास मिळणार आहेत, परंतु ही निवडणूक राजकीय पक्षाच्या प्रतिष्ठेची झाली आहे. यामध्ये राजकीय अनुभव व जनसंपर्काचा कितपत फायदा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचे शिवभक्त ग्रामविकास आघाडीचे सरपंच पदासाठी राहुल येनगंटीवार , तसेच उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे गावविकास परिवर्तन पॅनलचे सरपंचपदासाठी राकेश शंकवार तर अपक्षांचे जनसेवा ग्रामविकास पॅनलचे सरपंचपदासाठी नागेश धनकसार हे आहे . यामध्ये घमासान लढत आहे. यात राजकीय पक्ष जरी विजयाचा दावा करीत असले तरी त्यांची टक्कर ही अपक्ष पॅनलशीच राहणार आहे अशी मतदारात चर्चा आहे. त्यामुळे सर्वच तरुण पिढी विजयासाठी मेहनत घेत आहे त्यामुळे कायर ग्रामपंचायतीत काट्याची लढत होणार असे जनसामान्यातून बोलल्या जात आहे .