” बाळासाहेबांची शिवसेना ” ची कार्यकारणी जाहीर…
वणी विधानसभा संपर्क प्रमुख पदी विनोद मोहितकर,
तालुका प्रमुख पदी किशोरभाऊ नांदेकर याची निवड...
प्रशांत डी. जुमनाके /वणी
नुकतेच यवतमाळ येथे “बाळासाहेबांची शिवसेना ” पक्ष यांची कार्यकारणी बाबत सभेचे आयोजन करण्यात आले होते . या सभेमध्ये “बाळासाहेबांची शिवसेना” प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सूचनेवरून पक्ष सचिव संजय मोरे यांनी या पक्षाची यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर करण्यात आली असून ही सभा माधवा सभागृहात घेण्यात आली यावेळी कार्यक्रमात शिवसेना नेते अन्न व औषधी मंत्री संजय राठोड यांचे उपस्थित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यामध्ये वणी विधानसभा संपर्क प्रमुखपदी विनोद मोहितकर तर तालुका प्रमुख पदी किशोरभाऊ नांदेकार, उपजिल्हा प्रमुख पदी सुधाकर गोरे, तालुका संघटक टिकाराम खाडे, शहर प्रमुख ललित लांजेवार,यांची निवड करण्यात आली आहेत.यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.