25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

आंबेडकरी जनतेची 20 डिसेंबरच्या मोर्चाची जय्यत तयारी

आंबेडकरी जनतेची 20 डिसेंबरच्या मोर्चाची जय्यत तयारी

जयंत साठे नागपूर प्रतिनिधी:-  डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर, अंबाझरी, बचाव कृती समिती या संघटनेची विशेष बैठक डॉ. आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये डॉ. धनराज डाहाट यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 4 वाजता संपन्न झाली. त्या बैठकीत येत्या 20 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता यशवंत स्टेडियम जवळील पटवर्धन ग्राऊंडमधून निघून विधिमंडळावर जाणार्‍या भव्य मोर्चाची जय्यत तयारी करण्यासंबंधी सांगोपांग चर्चा झाली. या चर्चेत 37 प्रतिनिधींनी भाग घेतला. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला. हा मोर्चा ऐतिहासिक ठरावा, अशीच सर्वांनी आपली मते व्यक्त केली.
या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी काही कर्मचारी व सामाजिक व धार्मिक संघटना पुढे सरसावल्या आहेत. त्यामध्ये कास्ट्राईब, संविधान परिवार, बौद्ध विहार समन्वय समिती, बानाई, संयुक्त बौद्ध विहार समिती, विद्युत कर्मचारी संघटना, बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज आँर्ग, बहुजन हिताय संघ, पारिवारिक धम्मसंगोष्ठी, संथागार फाऊडेशन, समता सैनिक दल, परिसंघ, एचआरपीई, 1942 महिला क्रांती परिषद, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, लुंबिनी बहुउद्देशीय सभा, राष्ट्रीय बहुजन महासंघ, राष्ट्रीय मुक्ती मोर्चा, अ.भा. आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन, अ.भा. तांडा, सुधार समिती, दिनानाथ वाघमारे संघर्ष समिती, समाजक‘ांती, ऑल इंडिया समता सैनिक दल. या संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवून प्रत्यक्ष मोर्चात सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे.
या बैठकीत डॉ. सरोज आगलावे, डॉ. सरोज डांगे, छाया खोब्रागडे, तक्षशिला वाघधरे, सुषमा कळमकर, प्रा. पुष्पा घोडके, इंजि. सुषमा भड, अशोक सरस्वती बोधी, पुष्पा बौद्ध, अरुण गाडे, सिद्धार्थ उके, सुधीर वासे, आर.एस. अंबुलकर, मिलींद फुलझेले यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत डॉ. चंदू मैस्के, सुखदेव गडपायले, रामभाऊ बागडे, वर्षा शामकुळे, प्रकाश शामकुवर, छाया वासे, प्रमिला सोनवणे, जनार्दन मून, संजय सहारे, हरीश जानोरकर, सिद्धार्थ गजभिये, दिपक नाईक, मनोहर पाटील, ए.वाय. भगत, संजय रामटेके, डॉ. एम.एस. वानखेडे, डॉ. प्रबोधन मेश्राम, नंदकिशोर माटे, मीना भागवतकर, उज्वला गणवीर, विनोद मेश्राम, जी.डी. तायडे, बी.एस. वासे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत अ‍ॅड. रोशन बागडे यांचे जिल्हा वकील संघटनेच्या (डीबीए) अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. सुधीर वासे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून या बैठकीचे समापन केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News