कायर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गाव विकास परिवर्तन पॅनलचा प्रभाव।
शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी , जनतेचे पॅनल
सुरेंद्र इखारे वणी – तालुक्यातील कायर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षाचे गावविकास परिवर्तन पॅनलचे सरपंचपदासाठी राकेश विठ्ठल शंकावार हे छत्री चिन्हावर प्रभावशाली उमेदवार असल्याने निवडणुक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. वणी तालुक्यातील कायर ग्रामपंचायत ही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सध्या शिवसेनेच्या उमेदवारांचा बोलबाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार शिवसेनेचाच विजय पताका फडकवणार असा अंदाज आहे. शिवसेना पक्ष हा शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी व जनसामान्यांचा पक्ष असल्याने आता मतदारांवरच पक्षाच्या बालेकिल्ल्याची भिस्त असल्याने मतदारांपुढे मोठे आव्हान आहे. परंतु मागील पंचवार्षिकची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी गावविकास परिवर्तन पॅनलला मतदान केलं पाहिजे तरच शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत राहील असे आवाहन केले आहे. या निवडणुकीत सरपंचपदासाठी राकेश शंकावार छत्री या चिन्हावर तर सदस्यांमध्ये शेख सर्पराज अहेमद शेख नौशाद, संगीता साधू मडावी, प्रतिभा अनिल येललावार, नितीन नंदकुमार पेंदोर, मंदाबाई नारायण चौधरी, निर्मला अरविंद गुरनुले, स्वप्नील संजय इटबॉईनवार, विष्णू विठ्ठल मोहूर्ले, भारती प्रमोद बोगुलवार, हे जग, दूरदर्शन संच, व शिलाई मशीन या चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार अटीतटीची आहे.