कायर केंद्रातील क्रीडा महोत्सव थाटात संपन्न
चॅम्पियन ट्रॉफी जिल्हा परिषद शाळा गोडगावला ; शो ड्रिल मध्ये कायरचा प्रथम क्रमांक
सुरेन्द्र इखारे वणी – खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती वणी अंतर्गत कायर केंद्राच्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सैदाबाद येथे करण्यात आले होते . क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन वणी विधान सभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात झाले . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नवरगाव-सैदाबाद ग्रामपंचायत च्या सरपंच्या सौ. प्रियांका ताई घुगुल ह्या होत्या . यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी दिनकररावजी पावडे वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार , वणी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी स्नेहदीप काटकर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष टेकाम भाऊ शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य गण, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गण, कायर केंद्राचे केंद्रप्रमुख गजानन तुरारे, केंद्र मुख्याध्यापक कवडू जीवने व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महानायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच क्रीडा ज्योत प्रज्वलन आदरणीय आमदार संजयरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत जिल्हा परिषद शाळा कायरचे विद्यार्थी यांनी स्वागत गीत गायन करून तसेच पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद शाळा सैदाबाद चे मुख्याध्यापक श्री. सुभाष आत्राम यांनी केले. उद्घाटनीय कार्यक्रमांमध्ये आदरणीय संजीव रेड्डी बोदकुरवार आमदार साहेब, त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार साहेब, यांनी आपल्या मनोगतातून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. या क्रीडा महोत्सवात कायर केंद्रातील अकरा शाळानी शोड्रीलमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट शो ड्रिल सादर केले . तसेच
क्रीडा सामन्यांचे सांघिक व वैयक्तिक खेळ घेण्यात आले. या क्रीडा महोत्सवात चॅम्पियन ट्रॉफी जिल्हा परिषद शाळा गोडगावला प्राप्त झाली. तर शो ड्रिल मध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा कायरने पटकाविला .या संपूर्ण क्रीडा महोत्सवात शोड्रिल क्रिडा यांचे परीक्षक म्हणून विवेकानंद विद्यालयाचे शारीरिक शिक्षक सतीश घुले व सहायक शिक्षक रवी गोंडलावर यांनी केले होते.
क्रीडा सामन्यांमध्ये गावकऱ्यांनी अतिशय परिश्रम घेऊन मैदान तयार करणे व बाहेरगावून आलेल्या विद्यार्थ्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने खतीरदारी करून अतिथींचा सन्मान केला. .