दिव्यागाना चॉकलेट आणि बिस्कीट पुडे भेट देऊन वाढदिवस साजरा
प्रशांत जुमनाके/ वणी प्रतिनिधी
आज दिनाक १५/१२/२०२२ रोजी महेश सुधाकर कोसारकर यांचा वाढदिवस साजरा करावा या हेतूने त्यांनी अनोखा उपक्रम राबवला आहेत.महेश भाऊ हे पिल्की वाढोणा या छोट्या गावातील जन्माला आले. त्यांना लहान पणापासून समाज कार्यात मोठा रस असल्याने ते गोर गरीब जनेतच्या मदतीला धाऊन जातात. हा त्याचा मोठेपणा गावातील मित्रपरिवारांना फार आवडतो . गावच्या संबंधित कुठल्याही समस्या असल्यास महेश भाऊ हे ताठर उभे राहून समस्यांना दूर करण्याचे सहकार्याची भुमिकेत घेत असतात..आणि सेवाभाव पूर्ण काम करतात. असे भारदस्त व्यक्तिमत्त्व, तडफदार नेतृत्व ,असलेले युवा महेश भाऊ कोसारकर यांना ३० व्यां जन्म दिवसा निमित्ताने त्यांनी आपल्या वाढदिवस वणी येथील अपंग निवास शाळा वाघदरा येथील दिव्याग मुलांना भेट देऊन व त्यांना चॉकलेट आणि बिस्कीट पुडे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. त्यावेळेस त्यांचे सोबत सहकार्यासाठी उपस्थित गावचे नौजवन मेजर सुरज थेरे, शंकर कोसारकर, आदी अनेक दिव्यांग मुले ही उपस्थित होती..