21.4 C
New York
Wednesday, June 19, 2024

शेतमाल तारण योजनेची कार्यशाळा संपन्न….

* शेतमाल तारण योजनेची कार्यशाळा संपन्न.

* महाराष्ट्र राज्य वखार वणी यांचा उपक्रम….

प्रशांत जुमनाके / वणी

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ वणी यांचे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, व कृषी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने १५ डिसेंबर २०२२ रोजी घेतलेल्या ” वखार आपल्या दारी ” या जिल्हा स्तरीय कार्यशाळेत वणी तालुक्यातील सर्व शेतकरी , शेतकरी गट ,शेतकरी उत्पादन कंपनी, महीला बचत गट, महीला बचत गटाचे फेडरेशन, सहकारी संस्था, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आणि कार्यशाळेस आमंत्रित करण्यात आले होते.
यांनी उपस्थित राहून गोदाम उभारणी , गोदाम व्यवस्थापन तंत्रज्ञान, गोदाम विषयक शासनाच्या विविध योजना, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम पावती विषयी योजना राबविण्याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शेतमाल तारण कर्ज योजना या विषयावर विस्तृत माहिती देऊन शेतकरी यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहेत. याप्रसंगी मोठ्या संख्येने सर्व शेतकरी,शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी, महीला बचत गट, बचत गटाचे फेडरेशन, सहकारी संस्था , तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, व श्री आनंद बदखल मंडळ अधिकारी, श्री.संजय खाडे रंगनाथस्वामी फार्मर्स प्रो.कंपनी वणी तथा संचालक वसंत जिनिंग वणी, श्री जयसिंग गोहोकर माजी.सभापती पं.स. वणी, श्री पुरुषोत्तम आवारी संचालक वसंत जिनिन वणी, श्री स्वप्नील बागडे, केंद्र प्रमुख महाराष्ट्र वखार महामंडळ वणी. मोनाली शेंडे महीला आर्थिक विकास मंडळ, आदी उपस्थित होते..

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News