Thursday, October 3, 2024
Google search engine
HomeUncategorizedअखेरच्या रात्री कायरच्या राजकारण बदल अशी चर्चा 

अखेरच्या रात्री कायरच्या राजकारण बदल अशी चर्चा 

अखेरच्या रात्री कायरच्या राजकारण बदल अशी चर्चा       

  सुरेंद्र इखारे वणी –   कायरच्या राजकारणात कायम दबदबा असलेल्या शिवसेना पक्षाच्या उमेदवारीने दोन उमेदवारात काट्याची लढत असल्याने मतदारात बोलल्या जात आहे. परंतु अखेरच्या रात्री कायरच्या राजकारणात बदल होतो असे येथील वयोवृद्ध मतदारात चर्चा आहे. परंतु  दोघांमध्ये असलेली रणधुमाळी ही गावासाठी नाही तर तालुक्यासाठी सर्वाधिक लक्षवेधक ठरत आहे.       कायर ग्रामपंचायतीत सर्वाधिक दोन मोठे समाज आहे ते ही 500 ते 700 मतदारांचे असल्याने हा समाज नेहमीच राजकारणाच्या गणितात बदल घडवून आणत असतो कारण समाजाच्या सभा घेतल्या जातात त्यामध्ये ठरते की कुणाला निवडून आणायचे परंतु  शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार असो की मतदार असो कोण निवडून येईल हे सांगूच शकत नाही हा इथला इतिहास आहे. यंदाच्या निवडणुकीत तुल्यबळ लढत होत आहे.  कायरच्या निवडणुकीत यंदा मतदारांचाच उमेदवार असल्याने मतदारांनीच निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. एकीकडे शिवसेना, एकीकडे जनसेना व एकीकडे शिवभक्तांनी उडी घेऊन निवडणूक आणखीच रंगतदार केली आहे. मात्र खरी लढत ही दोघातच आहे अशी चर्चा आहे . या निवडणुकीत विजयासाठी कंबर कसून दावे- प्रतिदावे होत आहे. परंतु मतदार कुणाला प्रथम नागरिकाचा मान देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कायर ग्रामपंचायतीमध्ये तीन मतदान केंद्र आहे पहिल्या मतदार केंद्रात 742 मतदार, दुसऱ्या केंद्रात 599 मतदार तर तिसऱ्या केंद्रात 614 मतदार आहे असे एकूण 1955 मतदार मतदानाचा हक्क बजावणार यामध्ये 990 पुरुष मतदार तर 965 स्त्री मतदार आहे.हे मतदार  तीन वॉर्डातून एक सरपंच व नऊ सदस्यांची निवड करणार आहे परंतु सरपंचाची निवड अटीतटीत होणार आहे . असे कायरच्या मतदारात चर्चा असून सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे कायरच्या ग्रामपंचायतीकडे पोलीस प्रशासनाने अधिक लक्ष घातले असून बंदोबस्त तगडा ठेवला आहे. 

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments