मारेगाव येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बक्षीस वितरण संपन्न।
संविधान सप्ताह निमित्त प्रश्न मंजुषा व वादविवाद स्पर्धा
सुरेंद्र इखारे वणी – मारेगाव येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संविधान जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी संविधानावर आधारित प्रश्न मंजुषा व वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रश्न मंजुषा व वादविवाद स्पर्धेचे बक्षीस वितरनाचे अध्यक्षस्थानी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष जीवन पा.कापसे, प्रमुख पाहुणे न्यायाधीश निलेश वासाडे, नगराध्यक्ष मनीष मस्की, ठाणेदार राजेश पुरी, वनपरिक्षेत्र अधिकारी हटकर साहेब, प्राचार्य अविनाश घरडे, श्यामली वासाडे, उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी ऍड मेहमूद पठाण व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संविधानातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. वादविवाद स्पर्धेचा विषय भारतातील राजकीय गुन्हेगारी संविधाना समोरील आव्हान आहे की नाही . या विषयावर विद्यार्थ्यांनी आहे या बाजूने कौल दिला. तसेच प्रश्न मंजुषा स्पर्धेत प्रथम अनुराधा मुसळे, द्वितीय मयूर वरहाटे, तृतीय ऋषिकेश गोहणे, मानकरी ठरले, वादविवाद स्पर्धेत वैशाली घोरपडे प्रथम, नितेश डाहुले द्वितीय, सृष्टी सरकार तृतीय या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजेश चवरे यांनी केले प्रास्ताविक डॉ गजानन सोडणार यांनी केले तर आभार डॉ अनिल अडसरे यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ विनोद चव्हाण, प्रा अक्षय जेणेकर, प्रा डॉ नितीन राऊत, ऍड आशिष पाटील, सुरेश टेंभारे, पवन राऊत तसेच विधी सेवा समिती व महाविद्यालयाने पुढाकार घेतला.