अमृत वाचन लेखन स्पर्धेत किशोर गटात प्रणाली ताजणे सर्वप्रथम
सुरेन्द्र इखारे वणी – कायर येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी प्रणाली पांडुरंग ताजने हिने जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या अमृत वाचन लेखन अभियानांतर्गत शाळेतील बालवाचनालयातील “असा जाहला स्वतंत्र भारत”या पुस्तकाचे परीक्षण सौ.कुमुदिनी मोरेश्वर देवतळे पदवीधर विषय शिक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली करून अभिप्राय जिल्हा कार्यालयाला सादर करण्यात आला.किशोर गटामधून तिच्या अभिप्रायाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. आज दि.17/12/2022 ला यवतमाळ ग्रंथोत्सव मध्ये तिचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रणालीला सन्मानित करीत असताना यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यवतमाळ श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी , महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण मंत्री वसंतराव पुरके व इतर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते… या छोट्या बाल समीक्षकाचे व कायर शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षिकानी कौतुक केले व सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.