12.9 C
New York
Monday, May 20, 2024

आंबेडकर भवनासाठी काढलेल्या महामोर्चाने वेधले नागपूर करांचे लक्ष

आंबेडकर भवनासाठी काढलेल्या महामोर्चाने वेधले नागपूर करांचे लक्ष
मोर्चेकरी मुख्यमंत्र्यांना भेटण्यावर ठाम
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी:-  नागपूर येथील अंबाझरी तलावा शेजारील 44 एकर जागेत एक उद्यान व बाबासाहेब आंबेडकर स्मृती सभागृह गेली 57 वर्षापासून अस्तित्वात होते. ही जागा महाराष्ट्र शासनाने नागपूर महापालिकेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्मारक व गार्डन निर्मितीसाठी प्रदान केली होती. ती जागा 99 वर्षाच्या कराराने एका खाजगी कंत्राटदारास देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने केलेले करारनामे तात्काळ रद्द करावेत व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकासाठी असलेली जागा जशीच्या तशी ठेवावी यासह विविध मागण्यांसाठी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर अंबाझरी बचाव कृती समितीच्या वतीने महामोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. आजचा हा मोर्चा सर्व मोर्चापेक्षा लक्षणीय असल्याचे प्रतिपादन अनेक नागपूरकरांनी व्यक्त केले. या मोर्चामध्ये किशोर गजभिये, डॉ.धनराज डहाट, सुधीर वासे, बाळू घरडे, सिद्धार्थ उके, राहुल परुळकर, रामभाऊ आंबुलकर, प्रताप गोस्वामी, कमलताई गवई,इ. झेड. खोब्रागडे, रणजीत मेश्राम, यांनी मोर्चाला संबोधित केले. मोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियम पासून करण्यात आली. झिरो माईल्स जवळ मोर्चाला अडविण्यात आले असता मोर्चाला सामोरे जाण्यासाठी कोणताही मंत्री उपस्थित न राहिल्यामुळे मोर्चेकर्‍यांनी कुणालाच निवेदन दिले नाही. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही तोपर्यंत निवेदन देणार नाही या अटीवर मोर्चाकरी ठाम होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी राखीव ठेवलेल्या वीस एकर जमिनीवर डॉ. बाबासाहेबांचे भव्य स्मारक, ग्रंथालय, वाचन कक्ष, सभा कक्ष आदी त्वरित उभारण्यात यावे, जुने भवन बेकायदेशीर रित्या जमीनदोस्त करणाऱ्या संचालकावर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी तमाम आंबेडकरी जनता व संविधान प्रेमी लोकांनी हा संघर्षमय मोर्चा काढला होता. जोपर्यंत महाराष्ट्र शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी राखीव असलेली जमीन खाजगीकरणा अंतर्गत दिलेले हे कंत्राट रद्द करून पुन्हा त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यासाठी कार्यवाही करीत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहणार असे प्रतिपादन मुख्य संयोजक किशोर गजभिये यांनी केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News