स्व. विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालय तेजापूर संत गाडगेमहाराज पुण्यतिथी साजरी….
प्रशांत जुमनाके / वणी
वणी तालुक्यातील स्व. विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालय तेजापूर येथे संत गाडगेमहाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शेषराव बेलेकर होते. कर्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रेया मालेकार हिने केले तर प्रास्ताविक कु. ऐश्वर्या गिरसावळे हिने केले. कु. तन्हवी शिरपूरकर, यश डोहे, सुधीर शिरपूरकर, खुशांत लकडे, पल्लवी टेकाम यांनी आपल्या भाषणातून गाडगेबाबांच्या जीवनाकार्यावर प्रकाश टाकला. ‘तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी’ असे गाडगेबाबांनी देवविषयीचे तत्वज्ञान मांडले. स्वच्छता आणि शिक्षण यावर गाडगेबाबांचा विशेष कटाक्ष होता. श्री. शेषराव बेलेकार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून गाडगेबाबांनी आधी केले मग सांगितले. या उक्तीनुसार गाडगेबाबा जीवन जगले. विद्यार्थ्यांनी सुद्धा गाडगेबाबांचे काही गुण स्वतः आत्मसात करावे असा संदेश दिला. कर्यक्रमाकरिता श्री. मदन मडावी, प्रकाश गारघाटे, मारोती पिंपळकर, नयन नंदूरकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन यश डोहे याने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री. गजानन मालेकार, विजय मांडवकर, संतोष मालेकार, प्रवीण विधाते व संजय तामगाडगे यांनी परिश्रम घेतले.