पुसद येथे अतिक्रमण पथकावर भ्याड हल्ला।
आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी वणी नगर परिषद संघटनेने दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
सुरेन्द्र इखारे वणी – पुसद येथे अतिक्रमण मोहिमेअंतर्गत पुसद नगर परिषदेचे मुख्याधिकारी व अतिक्रमण पथकावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे निषेधार्थ कामबंद आंदोलनाचे निवेदन वणी नगर परिषद कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष माधव सिडाम व समस्त कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे याना दिले आहे. आज दिनांक 23 डिसेंबर 2022 रोज सकाळी 11.30 वाजता पुसद नगर परिषदेचे नियमित अतिक्रमण मोहिमेअंतर्गत आंबेडकर चौक ते गांधी चौकातील अतिक्रमण काढण्याकरिता गेलेल्या अतिक्रमण पथकावर व मुख्याधिकारी यांचेवर अतिक्रमण धारकांनी भ्याड हल्ला केला त्यामुळे भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपींना जो पर्यंत अटक होत नाही तोपर्यंत वणी नगर परिषद जिल्हा यवतमाळ यांचे अधिनस्त सर्व कार्यालयीन कामकाज आज दुपारी 3 वाजता पासून बंद करण्यात येत आहे व दोषींवर त्वरित कार्यवाही करून पोलीस प्रशासनास आदेश द्यावेत या मागणीचे निवेदन संबंधित अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ, प्रशासक नगर परिषद वणी, उपविभागीय अधिकारी पुसद, मुख्याधिकारी नगर परिषद वणी, पोलीस निरीक्षक वणी, याना देण्यात आले आहे यावेळी उपस्थित माधव सिडाम, इझहार शेख, विजय महाकुलकार, धम्म रत्न पाटील, महेश पारखी, राजेंद्र जयस्वाल, संजय पवार, सुभाष नरपांडे, मारोती मडकाम, इसाक रसिक, संजय दखणे, देविदास जाधव, भीमलेश्वर ताराचंद होते.