तालुक्यांतील कोतवाल कर्मचारी नागपूर हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार…
तहसिलदार यांचे मार्फत मा. जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन
प्रशांत जुमनाके / वणी
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिनाक २६/१२/२०२२ रोजी कोतवाल संघटना शाखा वणी येथील सर्व कर्मचारी सहभागी होणार असल्याबाबत सदर वि.तहसीलदार साहेब यांचे मार्फत मा.जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील कोतवाल कर्मचारी यांचे प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे नागपूर हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र कोतवाल संघटनेचे धरणे आंदोलन दिनाक २६/१२/२०२२ रोजी.कोतवाल संघटना सहभागी होत आहे. तरी वणी तालुक्यात कोतवाल कर्मचारी यांनी सहभागी व्हावे करिता वणी तालुक्यातील कोतवाल कर्मचारी यांना मुख्यालय सोडण्याची वपरवानगी मिळावी . त्या अनुषंगाने वि.तहसीलदार साहेब यांचे नेतृत्वात मा.जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे.