18.6 C
New York
Saturday, May 18, 2024

पीएचडी गाईड साठी २७ ला मोर्चा

पीएचडी गाईड साठी २७ ला मोर्चा

जयंत साठे नागपूर प्रतिनिधी:-  विद्यापीठातून पेट (PET) परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी (Ph D) गाईड मिळत नसल्याने विद्यापीठाने गाईड उपलब्ध करून द्यावा या प्रमुख मागणीसाठी 27 डिसेंबरला पेट-नेट परीक्षा पास झालेल्या व पेट-नेट परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी बुद्धिस्ट स्टुडंट्स असोसिएशन च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विधी मंडळावर मोर्चा काढण्याची तयारी केलेली आहे.
हा शिक्षित व पीएच डी धारकांचा मोर्चा मंगळवार दि 27 डिसेंबर ला दुपारी 1 वाजता यशवंत स्टेडियम येथून निघेल. मोर्चा व्हेरायटी चौक मार्गे, शहीद गोवारी टी पॉईंट येथे पोहोचेल.
उच्च शिक्षितांच्या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी व प्रस्थापित शासनाचे चुकीचे शैक्षणिक धोरण निदर्शनास आणून देण्यासाठी या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बुद्धिस्ट स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष व माजी माहिती संचालक भिक्खू महेंद्र कौसल व सचिव उत्तम शेवडे यांनी केले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News