डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन च्या शिष्टमंडळांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस व विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी : अंबाझरी येथील वीस एकर जमिनीवर असलेले व संबंधित विकासकाने उध्वस्त केलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन त्याच जागेवर उभारण्यात यावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची जागा ज्या करारान्वये खाजगी कंपनीस दिली आहे, तो करार रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी दि. 26 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी परिसर बचाव कृती समितीच्या सदस्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नागपूर विधान भवन येथे भेट घेतली व निवेदन देऊन या संबंधात चर्चा केली. या संपूर्ण प्रकरणात आंबेडकरी रिपब्लिकन आणि सर्व पुरोगामी व्यक्तींच्या मनात आक्रोश आहे. हा आक्रोश लक्षात घेवून या संवेदनशील विषयावर विरोधी पक्षाचे लक्ष वेधण्यासाठी ही भेट घेण्यात आली. यावेळी विधान सभेचे विरोधी पक्ष नेता अजित पवार यांनी या गंभीर व संवेदनशील विषयावर व्यक्तिगत लक्ष घालतो आणि तोडगा काढू असे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रश्नाकडे प्रामुख्याने लक्ष देऊन हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.या शिष्टमंडळात आमदार विकास ठाकरे, मनोहर चंद्रिकापुरे, कृती समितीचे मुख्य संयोजक किशोर गजभिये, डॉ. धनराज डहाट, बाळू घरडे, छायाताई खोब्रागडे, वर्षा शामकुळे, दिनेश अंडरसहारे, निखिल कांबळे इत्यादी सहभागी झाले होते.