इयत्ता 12 वि व इयत्ता 10 वि च्या लेखा परीक्षेचे अंतिम वेळापत्रक
सुरेंद्र इखारे वणी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 12 वि व 10 वि ची वेळापत्रक अंतिम करण्यात आलेली आहेत. इयत्ता 12 वि ची लेखी परीक्षा मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 पर्यंत तसेच इयत्ता 10 वि ची शालांत प्रमाणपत्र परीक्षा गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 ते शनिवार दिनांक 25 मार्च 2023 या कालावधीत आयोजित केली आहे. अंतिम वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर दिनांक 30 डिसेंबर 2022 पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे तसेच अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सएप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वातंत्रपणे परिक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा / कनिष्ठ महाविद्यालय याना कळविण्यात येईल उपरोक्त बाबत सर्व सबधितांनी नोंद घ्यावी असे राज्यमंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.