नगरपरिषद हद्दीतील साडपणी मुळे नागरिक त्रस्त…
सांडपाणी हटाव !!! आरोग्य बचाव !!! प्रशांत जुमनाके वणी : येथील नगरपरिषद हद्दीतील असलेले गुरूनगर परिसरात मागील काही दिवसापासून रस्त्यावर येणाऱ्या घरगुती सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ” जल हे जीवन आहे” असे संबोधल्या जाते.परंतु या पाण्याचा अपव्यय होताना आपणास डोळ्यांनी पाहायला मिळते. चक्क वणी शहरातील गुरूनगर परिसरा मधील काळे हॉस्पिटल बाजूला असलेले डीपी जवळील उत्तर – दक्षिण मुखी जाणारा रस्ता या रस्त्यावर काही घरचे नळाचे पाणी पूर्णतः रस्त्यावर सोडल्या जातात. त्यामुळे रस्त्यावर निरंतर पाणी वाहत असल्याने रस्ता हा पूर्णतः चिल्ला मय झाला असल्याने हा रस्ता अपघाताला आमंत्रन देत आहेत. रस्त्याने जाणारे – येणारे वाहने ही घसरत असल्याने या रस्त्यावर जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहेत. परंतु याकडे नगरपरिषद चे पूर्णतः दुर्लक्ष होताना दिसत आहेत. या रत्याचे बाजूला अनेक गोर – गरीब अतिक्रमण जागेवर राहत आहेत. चक्क या पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे . त्यामुळे मानवी जीवन हे धोक्यात आलेले आहेत .कसेतरी कोरोणा काळात सावरले असताना पुन्हा असे दिवस पाहण्याची वेळ येते की काय असा मोठा प्रश्न जनतेसमोर उपस्थित झाला आहेत. तरी याकडे नगरपरिषदेने काळजीपूर्वक लक्ष देऊन गुरूनगर येथील रस्त्यावरील सांडपाण्याचा बंदोबस्त करण्यात यावा . असे वणीकर जनतेतून बोलल्या जात आहेत.