लायन्स इंग्लिश मिडीयम कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
डॉ सुधाकर आगरकर यांचे वंडर ऑफ ग्लास या विषयावर मार्गदर्शन
सुरेंद्र इखारे वणी – येथील मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने लायन्स इंग्लिश मिडीयम कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे व्याख्याते मार्गदर्शक डॉ सुधाकर आगरकर जेष्ठ वैज्ञानिक व सेवानिवृत्त प्रोफेसर होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई हे उपस्थित होते. तसेच मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा महादेवराव खाडे, प्राचार्य प्रशांत गोडे, लक्ष्मणराव इद्दे सर, भारत गारघाटे, अभय पारखी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे व्याख्याते तथा मार्गदर्शक डॉ सुधाकर आगरकर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनी वंडर ऑफ ग्लास या विषयावर मार्गदर्शन करून त्यांनी काचेची निर्मिती, भौतिक व रासायनिक गुणधर्म, काचेचे विविध प्रकार व काचेचा विविध ठिकाणी होणार उपयोग इत्यादी गोष्टी वर आधारित पीपीटीचे सहाय्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उपस्थित मार्गदर्शकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे समर्पक पणे देण्यात आली होती या व्याख्यानाला लायन्स इंग्लिश मिडीयम कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील इयत्ता 11 वि व 12 वि ची विद्यार्थी विद्यर्थिनी व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्यख्यानाचा लाभ घेतला..