19 C
New York
Saturday, May 18, 2024

नेरडच्या शाळेत शैक्षणिक साहित्य निर्मिती ,प्रदर्शन व शिक्षण परिषद।          सुरेंद्र इखारे वणी –  जिल्हा परिषद उच्च. प्राथमिक शाळा नेरड येथे शैक्षणिक साहित्य निर्मिती , प्रदर्शन व शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती.      या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख राजेश  खुसपुरे सर  हे होते,  उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून नवनाथ  देवतळे सर माजी गटशिक्षणाधिकारी प्रमुख पाहुणे  किशोर  चहांदे सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक तेजापूर, चौहान सर,  उपस्थित होते, तसेच परीक्षक म्हणून मारोती पिंपळकर सर, प्रदीप बोरकुटे सर, चेतन पावडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पिंपळकर यांनी केले तर आभार  चौहान सर यांनी मानले. या प्रदर्शनात मराठी साहित्यात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तेजापूर , द्वितीय क्रमांक नेरड शाळेला तर तृतीय क्रमांक चेंडकापूर शाळेने प्राप्त केला तर गणित साहीत्य यात प्रथम क्रमांक नेरड ,द्वितीय क्रमांक पुरड तर तृतीय क्रमांक कृष्णानपुर शाळेने पटकाविला. इयत्ता 1 ली ते 5 वी च्या शिक्षकानी उत्कृष्ट साहित्य निर्माण केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नेरड शाळेच्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News