-1.3 C
New York
Friday, March 1, 2024

वणी ते नांदेपेरा मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतुक  

  1. वणी ते नांदेपेरा मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतुक       

अवजड वाहतुकी मुळे रस्त्याची लागली वाट ,वाहनांचे नुकसान

जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन

अपघातास जबाबदार कोण?       शासनाला लक्ष देण्याची गरज   

सुरेंद्र इखारे वणी –   वणी ते नांदेपेरा या  मार्गावरून अवजड वाहतूक करण्यास  बंदीचे आदेश दिले असतानाही  दिवस रात्र मोठ्या प्रमाणात  ओव्हरलोड वाहतूक होत आहे . त्यामुळे या जड वाहतुकीमुळे रस्त्याची पार वाट लागून मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान होत आहे याकडे मात्र बांधकाम विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे .          वणी ते नांदेपेरा या मार्गावरील अवजड वाहतुकीस बंदीचे आदेश जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिले असून त्यांच्या आदेशाचे उल्लंघन होताना दिसून येत आहे त्यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या जड वाहतुकीमुळे अपघात झाल्यास अनाठायी नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही .तेव्हा  या मार्गावरील जड वाहतुकिस आळा घालून येथील जनतेला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे . परंतु या मार्गावर जडवाहतु दिवस रात्र सुरूच  असल्याने, रस्त्याची वाट तर चांगलीच लागली  आहे मात्र हा मार्ग एकपदरी असल्याने हलक्या वाहनांना व दुचाकीस्वाराणा थेट अपघातास निमंत्रण द्यावे लागत आहे . तरी बांधकाम व वाहतूक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील नागरिकात असंतोष निर्माण झाला आहे.    वणी ते नांदेपेरा मार्गावरून अवजड वाहतुक बंद करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी पारित केला. व या मार्गाने जाणारी अवजड वाहतुक वणी-मारेगाव – करंजी – वडकी – खैरी – वरोरा (एकोना) मार्गाने वळविण्यात आली. पंरतु स्थानिक प्रशासना कडून आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने जिल्हा अधिकारीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत या मार्गाने रोज सर्रास अवैद्य अवजड वाहने दिवसरात्र धावत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

स्थानिक प्रशासनाकडून कारवाई ची गरज- प्रफुल शेंडे, नांदेपेरा ,यांनी सांगितले की नांदेपेरा ते वणी नेहमी प्रवास करतांना आम्हाला जिव मुठीत घेवुन प्रवास करावा लागत आहे . स्थानिक प्रशासना कडून यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने या मार्गाने अवजड वाहतुक दिवसरात्र चालू आहे.व याचा आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.यावर प्रशासनाने लक्ष देवुन ही अवजड वाहतूक थांबवावी अशी मागणी केली आहे.      तेव्हा शासनाने त्वरित कार्यवाही करून येथील नागरिकाच्या जीवाचे रक्षण करावे अशी मागणी सुध्दा जोर धरू लागली आहे तेव्हा शासनाने त्वरित लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News